सलग दुसऱ्या दिवशीही नगरपालिकेची प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई :5500 रुपयांचा ठोठावला दंड.

अमळनेर /प्रतिनिधी. सलग दुसऱ्या दिवशी नगरपालिका अमळनेर तर्फे प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग यांचा वापर केल्याकारणाने दोन दुकानदारांना एकूण 5500 रुपये दंड ठोठावला. येथून पथकाने एकूण 2.50 किलो प्लास्टिक जप्त केले . ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
नगर पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी शहरातील मुंबई चौपाटी व सोनू बागवान अमळनेर या दोघांकडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, पन्नी आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. यात मुंबई चौपाटी यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक साठवणूक व विक्री केल्याबद्दल 5000/- तर सोनू बागवान यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग मधून विक्री केल्याबद्दल 500/- रुपये दंड आकारण्यात आला. नगर परिषद मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , शहर समन्वयक गणेश गढरी, पथक कर्मचारी गौतम बिऱ्हाडे, योगेश पवार, महेंद्र बैसाणे, युनूस शेख, अश्रफ अली, समाधान बच्छाव आदी यांनी कार्यवाही केली.
तरी मुख्याधिकारी नगरपालिका अमळनेर मार्फत सर्व नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग यांचा वापर न करण्याचे व कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .