जाब विचारायला गेलेल्या मायलेकास चौघांनी केली मारहाण

अमळनेर /प्रतिनिधी. जाब विचारायला गेलेल्या मायलेकास चौघांनी मारहाण केल्याची घटना चोपडाई येथे नुकतीच घडली विशाल भागवत मोरे (२३, चोपडाई,ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,१६ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३०वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्याशाळेच्या आवारात गोकुळ रामापाटील हा लघुशंकेसाठी बसला होता.
त्याला याबाबत जाब विचारला असता,त्याने उलट उत्तर दिले. ही बाबविशालची आई वत्सलाबाई मोरे यांनी गोकुळ याचा भाऊ संजय याच्या कानावर घातली. त्यावेळेस गोकुळ पाटील शिवीगाळ करू लागला. त्याचा मुलगा राकेश पाटील याने लाकडी दांडा उचलून मारहाण करण्यासा सुरुवात केली. यात डोक्याला मारा लागल्याने विशाल याला जखम झाली
गोकुळ पाटील, संजय पाटील व वाल्मिक संजय पाटील यांनी वत्सलाबाई यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेकॉ कैलाश शिंदे करीत आहेत.