नणंद-भावजयमधील सामन्यात बारामतीकरांची परीक्षा. -बारामतीमध्ये प्रथमच पवार विरुद्ध पवार लढत.

0

24 प्राईम न्यूज 26 Apr 2024 महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामतीमध्ये प्रथमच पवार कुटुंबातच लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले. पक्ष स्थापन करणाऱ्या शरद पवारांना त्यांच्या नावासह नामविस्तार झालेलं पक्ष नाव आणि तुतारी वाजवणार माणूस हे नवे चिन्ह आयोगाने दिले आहे.
या नव्या नाव आणि चिन्हासह जुन्याच खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत, तर त्यांच्याविरोधात त्यांच्यावहिनी, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार
या नव्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढत आहेत. पवार कुटुंबातील सून प्रथमच निवडणूक लढवत आहे. नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचाविषय झाला आहे. भाजपचे मिशन बारामती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९७७, १९८५ हे दोन अपवाद वगळल्यास बारामतीवर कायम तिरंगा फडकला आहे. भाजपने त्यांच्या ऑपरेशन लोटस अंतर्गत राज्यातील १६ मतदारसंघांत बारामतीचाही समावेश केलेला होता. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे या मतदारसंघात वारंवार दौरे झाले, मात्र बारामतीचा गड जिंकायचा असेल तर पवारच पाहिजे हे भाजप धुरिणांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच भाजप एवढ्या वर्षांपासून लढत आलेला हा मतदारसंघ यंदा त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला. आता पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत होत आहे. नणंद-भावजय एकमेकांसमोर आहेत. बारामतीची जनता सुप्रिया सुळेंवर चौथ्यांदा विश्वास दाखवते की अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच ओरिजनल राष्ट्रवादी म्हणून मान्यता देत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करते ही बारामतीकरांचीच परीक्षा आहे. त्याचे उत्तर ४ जूनला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!