एकनाथ खडसेंचा भाजपप्रवेश रोखणारे स्पीड ब्रेकर कोण.

0

24 प्राईम न्यूज 26 Apr 2024. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येऊ द्यायचे नाही, असा चंग बांधलेले भाजपचे राज्यातील २ बडे नेते खडसेंच्या घरवापसीच्या मार्गात स्पीड ब्रेकर म्हणून आडवे आले आहेत. खडसे भाजपात आल्यास त्याचा पक्षाच्या प्रतिमेला मोठा फटका बसेल, अशी भूमिकाच या जोडगोळीने भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वाला पटवून दिल्याने १५ दिवस उलटूनही खडसेंचा पक्षप्रवेश झालेला नाही. खडसेंसारखा अनुभवी ओबीसी नेता पक्षात असावा म्हणून दिल्ली दरबारी वजन राखून असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना साथीला घेत खडसेंच्या पक्षप्रवेशासाठी जुळवाजुळव केली होती, परंतु राज्यातील या जोडगोळीने त्यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत. आधी लोकसभा निवडणुकीचे गणित सोडवू मगच खडसेंच्या पक्षप्रवेशाचे बघू, अशा मानसिकतेत सध्या भाजपचे दिल्लीतील नेतृत्व असल्याचे समजते. त्यामुळे मतदानाचे दोन टप्पे उलटूनही खडसेंचा पक्षप्रवेशाचा निर्णय अडगळीत पडला आहे. परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बसलेल्या खडसेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!