पराभवाच्या भीतीने भाजपचा रामनामाचा जप-उद्धव ठाकरे. -लोकसभेसाठी उबाठाचा वचननामा प्रकाशित.

24 प्राईम न्यूज 26 Apr 2024
भुताची भीती वाटली की रामाचा जप करतात तसेच पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यावर आता ते राम राम करू लागले आहेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्रात आधी इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि मग त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने महाराष्ट्रात पाडला आहे तो भरून काढू आणि महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देऊ, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा वचननामा जाहीर करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भुताची भीती वाटल्यानंतर रामाचा जप करायचा, मग भुतं पळायची असे म्हटले जायचे. हे सर्व आपण ऐकले आहे. खरं-खोट मला माहिती नाही, मात्र आता भाजपची अवस्था अशीच काहीशी झाल्याचे दिसते