गाडीच्या काचा फोडून महिलेचा लॅपटॉप लांबवला!

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर लग्नासाठी आलेल्या महिलेचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने गाडीच्या काचा फोडून चोरून नेल्याची घटना २८ एप्रिल रोजी बजरंग पॅलेसनजीक घडली.
काजल रवींद्र पवार (पनवेल) या एका खाजगी कंपनीत नोकरीला असून, त्यांना कंपनीने कामासाठी २५ हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप दिला होता. २८ एप्रिल रोजी नातेवाइकांचे लग्न बन्सीलाल पॅलेसलाअसल्याने लॅपटॉप सोबत आणून तो नातेवाइकांच्या गाडीत ठेवला होता. लग्न आटोपल्यावर लॅपटॉप घेण्यासाठी गाडीजवळ पाहिले असता अज्ञात व्यक्तीने गाडीच्या क्लिनर बाजूची काच फोडून लॅपटॉप चोरून नेल्याचे दिसून आले अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेरपोलिसात भादंवि कलम ३७९, ४२७नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाअसून, पुढील तपास पोलिस करीतआहेत.