मतदानाची टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. पालिका प्रशासना मार्फत मतदान स्पर्धेचे आयोजन.

0

अमळनेर /प्रतिनिधी. लोकसभा निवडणुकीतअमळनेर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी पालिका प्रशासनामार्फत मतदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.प्रथम येणाऱ्या स्पर्धकांना सुवर्णप्रमाणपत्र, द्वितीय येणान्यास रजतप्रमाणपत्र, तर तृतीय येणाऱ्यास कांस्यप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणारआहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवून मतदारांची जनजागृती करीत आहे. यासाठीअमळनेर नगर परिषदमार्फत मतदान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरातील गणपती, दुर्गा
उत्सव मंडळ, सार्वजनिक व्यायाम
शाळा, सामाजिक संस्था, विविध क्लब,गट, रहिवासी कॉलनी संघ, व कमीत कमी १०० सदस्य असलेल्या संस्था या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत.

आपल्या भागातील १०० टक्के मतदान झाल्यास त्यास प्रथम पारितोषिक सुवर्ण प्रमाणपत्र, ९५ ते ८६ टक्के मतदान झाल्यास त्यास ७५ गुण देऊन द्वितीय रजत प्रमाणपत्र व ८५ टक्के मतदान झाल्यास त्यास ५० गुण देऊन तृतीय कांस्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल लिंक पालिकेमार्फत देण्यात आली आहे. त्यावर ११ मे रोजी ५ वाजेपर्यंत माहिती भरायची असून, १७ मे रोजी कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सभाप्रमुख महेश जोशी, शहर समूह संघटकचंद्रकांत मुसळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!