चांदवड नजीक बस-ट्रक अपघात ५ ठार ३३ जखमी.

0

24 प्राईम न्यूज 1 May 2024. आग्रा महामार्गावरील चांदवडनजीक राहड घाटात मंगळवारी सकाळी ट्रक आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवासी ठार, तर ३३ प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातात पालघर विभागाच्या जळगाव-वसई एसटी बसचा निम्मा भाग अक्षरशः कापला गेला. चांदवड पोलिसांनी वाहून्चालक शैलेश सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शैलेश सूर्यवंशी कानाला हेडफोन लावून बस चालवत असल्याचे तक्रारीत नोंदवले आहे. चट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. या अपघातात खालिदा गुलाम हुसेन (५८, रा. भिवंडी), बळीराम सोनू आहिरे (७३, रा. कॉलेज रोड, नाशिक), सुरेश तुकाराम सावंत (२८, रा. डोंगरगाव, मेशी, नाशिक), साई संजय देवरे (१४, रा. उमराणे, जि. नाशिक) आणि बसवाहक विनोद पोपट शिंदे (३८, रा. जेऊर, पाथर्डे, मालेगाव, जि. नाशिक) यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!