अमळनेर मतदारसंघात ३८२ मतदान यंत्रे उपलब्ध. – प्रताप महाविद्यालयात मतदार यंत्रे सुरक्षित

अमळनेर /प्रतिनिधी. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे, अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी ३८२ मतदान यंत्रे दाखल झाली असून प्रताप महाविद्यालयाच्या राणे सभागृहात सीलबंद करून कडक पहाऱ्यात ठेवण्यात आली आहेत.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात ३२४ मतदान केंद्रे आहेत. मतदान यंत्र खराब होणे अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तातडीचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून जादाची मतदान यंत्रे सज्ज आहेत. प्रशासनाने सर्व यंत्रे तज्ज्ञांमार्फततपासून त्यांची बॅटरी क्षमताही तपासली आहे. एकूण ३८२ बॅलेट युनिट, ३८४ कंट्रोल युनिट आणि ४१६ व्हीव्हीपॅट अमळनेर मतदारसंघासाठी उपलब्ध आहेत.
राणे सभागृहात सील करून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एक अधिकारी व चार कर्मचारी दररोज रात्रंदिवस पहारा देणार आहेत.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक विकास देवरे या अधिकाऱ्यांचे त्यावर नियंत्रण असणार आहे.