दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी सक्षम अॅपची निर्मिती

24 प्राईम न्यूज 4 May. आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम’ नावाचे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ईसीआय हे अॅप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेल्या सक्षम अॅपवर विविध सुविधा दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम दिव्यांग मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये सक्षम अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदार संघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होणार आहे. या अॅपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने- आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहेत.