■ सुषमा अंधारेंचे हेलिकॉप्टर कोसळले सुषमा अंधारे बचावल्या

24 प्राईम न्यूज 4 May 2024. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचे शुक्रवारी सकाळी महाडमध्ये क्रॅश लँडिंग झाले. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच हेलिकॉप्टर काही फुटांच्या अंतरावरून खाली कोसळले. पायलटला कोणतीही इजा झालेली नाही.
गेल्या २ दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गितेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर होत्या. शुक्रवारी आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना जमिनीपासून काही फुटांवर असताना हेलिकॉप्टरवरील पायलटचे नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले. मला कोकणात ३ सभा आणि मंडणगड, रोहा या ठिकाणी जायचे असल्याने मला हेलिकॉप्टर घ्यायला येणार होते. आम्ही हेलिपॅडजवळ आलो असताना हेलिकॉप्टरने २ ते ३ घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला. सुदैवाने कॅप्टन सुखरुप आहेत, असे सुषमा अंधारेंनी सांगितले.