भाजप पुन्हा आल्यास उद्धव ठाकरे तुरुंगात !मुख्यमंत्री केजरीवालांचा खळबळजनक दावा.

24 प्राईम न्यूज 12 May 2024… येत्या लोकसभा निवडणुकीत जर भाजपचा विजय झाला आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लवकरच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, स्टॅलिन, ममता बॅनर्जी तुरुंगात दिसतील, असा धक्कादायक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केला. दिसताल
शनिवारी सकाळी केजरीवालांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नंतर आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडी मोठ्याफरकाने जिंकणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला, मात्र या निवडणुकीत भाजपा जिंकली तर उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव हे सगळे तुरुंगात जातील हे मी लिहून देतो, असा दावादेखील त्यांनी केला. त्यांना एक राष्ट्र आणि एक नेता एवढेच हवे आहे. म्हणजेच देशात त्यांच्याशिवाय अन्य कोणताही नेता असू नये अशी नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे आणि हे काम ते दोन पातळ्यांवर करीत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना ते तुरुंगात टाकत आहेत, असे ते म्हणाले.