करकरेंच्या गोळ्यांविषयी बोला-प्रकाशआंबेडकर

24 प्राईम न्यूज 12 May 2024. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी तत्कालीन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना लागलेल्या ज्या गोळ्या मिळाल्या, त्या जर पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नव्हत्या, तर मग त्या कोणाच्या होत्या याचा अॅड. उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारयांनी अलीकडेच भाजपवर निशाणा साधताना हेमंत करकरे यांना लागलेल्या गोळीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले असताना आंबेडकर यांनी शनिवारी हाच मुद्दा आणखी पुढे नेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांना यात ओढले. निकम यांनी २६/११ हल्ल्याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम केले ■आहे. अॅड. निकम आता भाजपचे मुंबई उत्तर मध्यचे लोकसभा उमेदवार आहेत. निकम निवडून आले त ■ संसद सदस्य बनतील. संसद सदस्यांनी पारदर्शक असणे ■ अपेक्षित असते. त्यामुळे करकरे यांना लागलेल्या गोळ्यांसंदर्भात अॅड. निकम यांनी निवडणुकीच्या आधी – उत्तर द्यायला हवे, असे आंबेडकर म्हणाले.