दोंडाईचा शहरात वीजांच्या कडकडाटसह वादळी पाऊसामुळे झाडे उन्मळली,किराणा दुकानदाराचे कॉंक्रीटयुक्त स्लॅबचे छत कोसळले.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
दोंडाईचा शहरात आज 12 मे रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास वादळ वारा व विजांचा कडकडासह एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे दोंडाईचा शहरातील विविध भागात अनेक झाडे उन्मळून पडली तसेच काही झाडांच्या फांद्या तुटलेल्या होत्या. सेंट्रल बँकेसमोर एक मोठे झाड वीजतारांवर पडल्याने विजतारा तुटल्या होत्या तसेच या ठिकाणी एक वीज पोल वाकलेला होता. रोटरी आय हॉस्पिटल कडे जाणारा रस्त्यावर काही झाडे व त्यांच्या फांद्या तुटून पडल्याने हा रस्ता बंद झाला होता या ठिकाणी पालिकेने जेसीबी मशीन च्या साह्याने तुटलेली झाडे व फांद्या बाजूला सारत रस्ता मोकळा केला तसेच दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील रुपचंदाणी नामक किराणा दुकानदार मालकाच्या दुकानावरील काँक्रीटयुक्त स्लॅबचे छत खाली कोसळले. सुदैवाने ही घटना पहाटे झाली. अन्यथा जीवितहाणीची शक्यता बळावली असती. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठा बराच वेळ खंडित होऊन बंद झाला होता.तसेच शहरात विविध रस्त्यावर पाणी साचले होते. शहरात विविध ठिकाणी दोंडाईचा नगरपालिका प्रशासन कर्मचारींमार्फत शहरातील तुटलेल्या झाडावरील फांद्या ट्रॅक्टर मध्ये टाकून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू होते तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचारींनी वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरळीत केला.