मी यापुढे निवडणूक लढणार नाही-एकनाथ खंडसे

24 प्राईम न्यूज 13 May 2024. मी यापुढे निवडणूक लढणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही, असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अजूनही लांबलेला आहे. अशातच खडसेंनी आपल्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीबद्दल मोठे विधान केले आहे.
एका मुलाखतीत बोलताना खडसे म्हणाले की, मी अजूनही ५ वर्षे विधान परिषदेचा आमदार आहे. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोक माझा राजीनामा मागत असतील, तर मला त्याच्याशी देणेघेणे नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही.