अमळनेर तालुक्यातील ४४ दारू दुकानांना लावले सिल…

अमळनेर /प्रतिनिधि . निवडणुकीचा प्रचार संपला आणि अमळनेर तालुक्यातील ४४ दारू दुकानांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने राज्यउत्पादन शुल्क विभागातर्फे सील लावण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन व्हावे, बळाचा वापर, पैसे, दारूचे आमिष दाखविण्यात येऊ नये, यासाठी मद्यविक्री पूर्णपणे बंद असावी, असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास देशी दारू दुकाने, वाइन शॉप, बियर बार, ताडी विक्री अशी ४४ दुकाने सील लावून बंद करण्यात आली आहेत. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सील लावलेले असेल, असे निरीक्षक देवदत्त पाचपोळ यांनी सांगितले. निवडणूक काळात अनेक दुकानदार बंदी असतानाही चोरून लपून दारू विकतात. म्हणून यंदा फक्त बंदीचे आदेश देण्यापेक्षा उत्पादन शुल्क विभागाचे डी. एस. पाचपोळे, राहुल सोनवणे, विजय परदेशी यांनी दकानांना सील लावले आहेत,