भविष्यात हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान. -असदुद्दीन आवेसी

24 प्राईम न्यूज 13 May 2024. भविष्यात हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान बनेल. पण ते पाहायला कदाचित मी जिवंत नसेन, असे भाकीत एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. भारताला मुस्लीम पंतप्रधान कधी मिळणार? असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांना विचारण्यात आला असता ते महणाले की, भविष्यात एक दिवस असा येईल की हिजाब घातलेली महिला देशाची पहिली
भीमुस्लीम पंतप्रधान बनेल आणि देशावर राज्य करेल, कदाचित तो दिक्स पाहण्यास
मी जिवंत नसेन, पण हे नक्की घडेल,असे ओवेसी महणाले.इंडिया आघाडीशी युती का केली नाही यासंदर्भात ओवेसी म्हणाले की, आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीनवेळा इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी निरोप दिला. मात्र, त्यांच्या निरोपाची साधी दखलही इंडिया आघाडीने घेतली नाही. कुणी जर आम्हाला आघाडीत घ्यायला तयार नसेल तर आम्ही त्यांच्या मागे का लागाये ? उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांत आम्ही छोट्या पक्षांशी आघाडी केली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची राजकीय वाटचाल सुरूच ठेवू, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.