जळगावला ५१ तर रावेरला ५५ टक्के मतदान अमळनेर येथे  ४७.४०  मतदान झाले.

0

अमळनेर/प्रतिनिधी

जळगाव जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जळगाव मतदारसंघात ५१.९८ तर रावेर मतदारसंघात५५. ३६ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले जात असतांना मोठयाप्रमाणावर मतदान झाले नाही.

जळगाव जिल्हयात नागरिकांनी मतदान करण्याबाबत जागृती करणारे सामाजिक शैक्षणिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर अभियान राबवण्यात आले त्याचा योग्य परिणाम होउन आज सकाळी सात वाजता जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी मतदानास प्रारंभ होताच नागरिक उत्साहाने सकाळच्या थंड वातावरणात मतदानासाठी बाहेर पडले. अकरावाजेपर्यंत जळगाव मतदारसंघात १६.८९ टक्के तर रावेर मतदारसंघात १९.०३ टक्के मतदान नोंदवले गेले तर दुपारी एक वाजता जळगावला ३१ टकके तर रावेरला ३२ टककेमतदानाची नोंद झाली दुपारी तापमानामुळे मतदानावर परिणाम झाला आणि पाच नंतर उन्ह कमी झाल्यावर परत मतदार मतदान केंद्राकडे वळले सायंकाळी पाच वाजता जळगाव साठी ५१.०८ तर रावेरसाठी ५५.३६ टेकके मतदान झाल्याची नोंद झाली. सायंकाळी सहा नंतर अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या.जळगाव मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार हे उमेदवार आहेत. या मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ५१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. एरंडोलमध्ये सर्वाधिक ५५.८४ टक्के तर, सर्वात कमी अमळनेर येथे (४७.४०) मतदान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!