विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास आठ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा..

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर जिल्हा न्यायाधीश पी आर चौधरी यांनी , विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील शिक्षकास दोन स्वतंत्र शिक्षा सुनावतांना एकूण आठ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एकूण ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा दिली आहे.आरोपी हा पिढीता फिर्यादी मुलगी ही नुतन माध्यामिक विदवालय चुंचाळे, ता. चोपडा याठिकाणी इयत्ता ४वी व वर्गात शिक्षण घेत होती. आरोपी सुनिल संतोष मागवत हा देखिल सदर शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहे. यातिल आरोपी यांने पिडीता फिर्यादी ही अपल्वयीन असल्याचे माहित असतांना त्यांने पिढीता फिर्यादी मुलीसोबत वैयक्तीक संबंध प्रस्तापीत करण्याचे वाईट उद्देशाने आरोपी याने त्याचे मोबाईलवरुन पिढीता फिर्यादीची आईच्या मोबाईल यावर वेळोवेळी पिडीता फिर्यादी यांना फोन करुन पिढीता फिर्यादी यांचेशी फोनवरून अश्लील संभाषण करुन दिनांक 04.02.2023 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वा सुमारास नुतन माध्यामिक विदयालय चुचाने ता.चोपडा येथील इयत्ता 8 वी च्या वर्गामध्ये यातील विद्धीत फिर्यादी ही एकटी असतांना आरोपी यांने मिड़ता फिर्यादीस पकडुन तिचे बोठाचा किस घेवुन पिढीता फिर्यादीचे छातीवर हात फिरवुन फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले म्हणून पिडीता फिर्यादीने फिर्याद दिली होती. मा. न्यायालयात आरोपी विरुन्द 354,354, (1),354 (6),509 मा.द.वि. व बा.लै.गु.सं.अभि. 2012 चे कलम 8.12 प्रमाणे दोषारोप ठेवण्यात आला. सदर कागी मा. जिल्हा न्यायाधीश 2 श्री. पी. आर. चौधरी साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी कामकाज पाहिले सदर खटल्या एकुण साक्षीदार तपासले. सदर खटल्यातील सरकार पक्षा तर्फे एकूण 09 साथीदारांची साक्ष नोंदविण्यात आले. पैकी पिडीता, पिडीतेची आई व शाळेतिल शिक्षक, मुख्याध्यापक यांचे जाबाब ग्राहय धरण्यात आले. बात आरोपीचा मुलगा यांचेदेखील जबाब मे. कोर्टात घेण्यात आला. त्याचा देखील जबाब सरकारी पक्षास मदत होईल अशा पध्दतीचा असल्याने व तपासणी अधिकारी श्री घनश्याम चंद्राकांत तांबे. पि.एस.आय, यांनी तपास केला सदर खटल्यात मा.न्यायालयाने आरोपीस बा.लै.गु.सं.अधि. 2012 चे कलम 7.8 अंर्तगत 5 वर्षांचा सश्रम कारावास व दंड रुपये 50,000/- दंड व दंड नमरल्यास महिन्याची साधीकैद. बा.लै.गु.सं.अधि. 2012 चे कलम 12 अंर्तगत 3 वर्षाचा सश्रम कारावास व दंड रुपये 25.000/- दंड व दंड नभरल्यास 4 महिन्याची साधी कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या कामी पैरवी अधिकारी, ए.एस.आय. उदयसिंग साळुंके, व कॉ. नितीन दिलीप कापडण, पो. नाईक हिरालाल पाटील, पो.कॉ. राहुल रणधिर, पो. कॉ. अशिष पाटील यांनी काम पाहीले.