अजितदादांना एकही जागा मिळणार नाहीमहायुतीला राज्यात १८ जागा. -आमदार रोहित पवार

24 प्राईम न्यूज 15 May 2024. लोकसभा निवडणुकांमध्ये धनाढ्य पक्षांकडून नेते, गुंड विकत घेण्यासाठी पैशांचा अक्षरशः महापूर आला आहे. या निवडणुकीत सुमारे २ हजार कोटींचे वाटप महायुतीकडून करण्यात येत आहे. याबाबतचे काही पुरावे आम्ही सोशल मीडियावर टाकले आहेत, परंतु आता जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून आमचा नव्हे तर महायुतीचा फुगा आता फुटला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता भाजपला १३ ते १४, तर शिंदे गटाला ४ जागा मिळतील. अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले. –काय म्हणाले रोहित पवार?
राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत
बारामतीत १५० कोटींचे वाटप झाले.
अजितदादांच्या पक्षाचे चिन्ह निडणुकीनंतर गोठवले जाईल.
अजित पवारांना कमळाशिवाय आता पर्याय नाही.
मोदींना शेतकरी रोषाला सामोरे जायला भीती वाटते.
- जनता, शेतकरीवर्ग नाराज असल्यानेच मोदींना गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ
- मुंबईमध्ये होर्डिंग पडले ती जागा रेल्वे पोलिसांची
होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी कोणी दिली?
- जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच हा मुद्दा उपस्थित केला होता.
- महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला, त्याचे
काय झाले ?