अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून अतिप्रसंग, आरोपीला १५ वर्षांचा कारावास

0

अमळनेर प्रतिनिधी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी धीरज रवींद्र फुगारे (२०, गोरगावले ता. चोपडा) याला १५ वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर जिल्हा सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.

६ जानेवारी २०२२ रोजी अल्पवयीन मुलीचे आई, वडील आणि आजोबा शेतात गेले होते, त्यावेळी धीरज हा दुपारी त्यांच्या घरात गेला. ‘तू मला फोन का लावत नाही’, असं म्हणत त्याने मुलीवर अतिप्रसंग केला. मुलीला मारहाणही करण्यात आली, यात ती जखमी झाली.

सायंकाळी आई-वडील घरी आलेअसता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिला उपचारासाठी चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबाबावरून धीरजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात सरकारी वकील अॅड. शशिकांत पाटील यांनी ११साक्षीदार तपासले, पैरवी अधिकारी म्हणून एएसआय उदयसिंग साळुंखे, पोकों, आकाश पाटील, नितीन कापडणे, हिरालाल पाटील, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!