मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी..

24 प्राईम न्यूज 17 May 2024.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी नाशिक जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर होते. नाशिकच्या निलगिरी हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरताच निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पोलिसांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. त्यांच्यासोबत ज्या बॅग होत्या त्यांचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात कपडे, औषधे आदी त्यांच्या दैनंदिन वापराच्याच वस्तू सापडल्या. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. नाशिकमध्ये पैशाचा पाऊस, बॅगा वाटप सुरू आहे, असे आरोप राऊत यांनी केले होते.