वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आज आयोजन..

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन उद्या दि १७ मे रोजी करण्यात आले आहे.
सर्व आय.टी.आय., १० वी आणि १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून सकाळी ठीक ९ वाजता सदर कॅम्पस इंटरव्यूला सुरवात होणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड येथुन कॅम्पस इंटरव्यू साठी कंपनीचे एच आर व सुपव्हायझर येणार आहेत. तरी वरील सर्व गटातील विद्यार्थ्यांनीया सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा सोबत येताना सर्व ओरिजनल डॉक्युमेंट व झेरॉक्स कॉपीचा सेट, पासपोर्ट साईज फोटोसोबत आणावा, वत्साई संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज युनिफॉर्म मध्ये यावे. बाहेरच्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म अनिवार्य नाही असे कळविण्यात आले आहे.
सदर इंटरव्ह्यू वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉवर हाऊस च्या पाठीमागे धुळे रोड, अमळनेर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी ७७५७८७७५७५, ९४२३७६८०६८ यावर संपर्क साधावा.