श्री क्षेत्र पद्मालय येथे श्री गणेश जयंती उत्साहात साजरी.

एरंडोल (प्रतिनिधि) पर्यटनाच्या आनंद हिरवा परिसर सुंदर वातावरण कमळाचे नैसर्गिक सौंदर्य असा विलोभनीय वातावरणात श्रीक्षेत्र पद्मालय येथे 25 जानेवारी 2023 रोजी श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कासोदा, तळई व शिरसोली येथील पायी दिंडी व पालखी यांचे आगमन झाले या दिंड्यांमध्ये भाविकांची बऱ्यापैकी उपस्थिती होती.
कासोदा येथील १९ वर्षाची परंपरा असलेली पायी दिंडी व पालखी यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र पद्मालय येथे आली यानिमित्त गोपाल पांडे मुकुंद कुलकर्णी सुनील चंदाने मधुकर सौंदाणे व इतर भाविकांची उपस्थिती होती तळई येथील दिंडी सुमारे ५०० वारकरी होते सद्गुरु गोविंद महाराज यांच्या मठातून आदल्या दिवशी रात्री मुक्कामी होती
शिरसोली येथून सुद्धा पायी दिंडी आली होती यावेळी दिंड्यांमध्ये सहभागी असलेल्या भाविकांनी गणेश दर्शनाचा लाभ घेतला