उद्या दहावीचा निकाल.

0

24 प्राईम न्यूज 26 May 2024.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी शनिवारी परिपत्रकाद्वारे दिली. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या वेबसाईटवर निकाल बघा

  • https:// mahresult.nic.in

http:// sscresult.mkcl.org https://sscresult.

mahahsscboard.in

https://results.dig ilocker.gov.in

https://results.tar getpublications.org

या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असेल. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या ५ दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छाया प्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification. mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. गुण पडताळणी आणि छाया प्रतीसाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करून शुल्क भरता येईल.

मार्च २०२४ च्या दहावीची परीक्षा सर्व विषयांसह देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै- ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!