आज पासून जळगाव पुणे विमान सेवा सुरू. आठवड्यातून चार दिवस.

24 प्राईम न्यूज 27 May 2024 ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीने गेल्या महिन्यात गोवा-जळगाव-हैदराबाद अशी विमान सेवा सुरू केल्यानंतर, आता पुण्यासाठी देखील विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. जळगावकरांच्या मागणीनुसार, आणि पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, सोमवार, २७ मे पासून पुणे सेवा सुरू होईल. ही सेवा आठवड्यातून चार दिवस चालणार आहेविमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या मार्गावरचे शेड्युल तयार केले आहे आणि तिकीट बुकिंग सुरू केले आहे. गोवा-जळगाव सेवा दररोज चालू राहील, तर पुणे- जळगाव-पुणे सेवा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार असेल.
भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उड्डाण ५.० योजने अंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.
विमान कंपनीने २५ आणि २६ मे रोजी जळगाव ते पुणे अशी विमान सेवा दोन दिवस ट्रायल बेसवर चालवली. त्यानुसार, गोव्यावरून जळगावला, जळगाववरून पुण्याला, पुण्यावरून जळगाव आणि नंतर गोव्याला विमानाने उड्डाण केले.