अजित पवारांचे आव्हान दमानियांनी स्वीकारले.

0

24 प्राईम न्यूज 31 May 2024. पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली होती. यावर अजित पवारांनी ४ दिवसांनंतर नार्को टेस्टचे चॅलेंज स्विकारले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी माझी नार्को टेस्टची तयारी आहे. पण मो नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने परत कुठे तुमच्या पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, आहे का तिची तयारी, असा सवाल उपस्थित केला. त्यावर दमानिया यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे. यासंदर्भात दमानिया यांनी एक्सवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी अजित पवारांनी दिलेले आव्हान स्वीकारत मी गप्प घरी बसावे आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा, असे त्यांचे म्हणणे असेल तर हे मला मान्य आहे. कभी करणार नार्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा, नार्को टेस्टचे प्रश्न मी पाठवेन, असे दमानिया म्हणाल्या. त्याआधी अंजली दमानिया यांनी अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी केलेल्या टीकेवरून संताप व्यक्त केला होता. सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना रोचार्जवर काम करणारी बाई अशी टीका केली होती. मी काय आहे आणि किती सिध्दांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगले कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा ? का? सध्या मर्यादा न पळणा-या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा का देता? मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचा कडून लिखित स्वरुपात माफी हवी आह, असे दमानिया यांनी म्हटले होते. राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलत राहणार आहोत. तुम्ही त्याची उत्तरे द्यायलाच पाहिजे. तुम्ही म्हणत आहात माझ्या सेल फोनची तपासणी करायची आहे तर माझा सेलफोन हवा तेव्हा घेऊन जावा. जे सीडीआर काढायचे आहेत, ते काढा. ज्याची चौकशी करायची आहे ती करा. पण तुमच्या अजित पवारांची चौकशी त्याच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!