विधान परिषदेच्या सर्व जागा लढविणार. जरांगे पाटील.

24 प्राईम न्यूज 1 Jun 2024. मराठा आरक्षणासाठी समाजाला एक छत्राखाली आणून सरकारशी दोन हात करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत थेट सहभाग न घेता ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा. असे म्हणून ते तटस्थ राहिले. परंतु तरीही बऱ्याच मतदारसंघात मराठा एकवटला आणि त्याचे पडसादही उमटले. आता त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांत विविध जाती-धर्माचे उमेदवार मैदानात उतरविणार असल्याची घोषणा जरांगे-पाटील यांनी शनिवारी केली. त्यामुळे आगामी काळात राज्यात राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीतच
मनोज जरांगे-पाटील यांनी थेट सक्रिय होण्याचीभूमिका घेतली होती. परंतु लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती आणि एकूणच राजकीय आखाड्यात नको, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी सावध भूमिका घेतली. परंतु आता त्यांनी थेट विधानसभेच्या मैदानात उतरविण्याची घोषणा केली. त्यामुळे लोकसभेपेक्षा राज्यात विधानसभेची रणधुमाळी अधिक रंगण्याची चिन्हे आहेत. मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे कोर्टात एक खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
जरांगे यांनी आधीच ४ जूननंतर आपण मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच त्यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होणार आहे. त्यातच लोकसभेनंतर राज्य विधानसभा निवडणुकीचे वेध लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात जरांगे-पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीतीच जाहीर करून टाकली. त्यामुळे विधानसभेच्या लढतीत चुरस वाढणार आहे.