शरद पवार यांना देणार ८५ आमदारांचे गिफ्ट. आ. रोहित पवार

24 प्राईम न्यूज 11 Jun 2024.
येत्या डिसेंबरमध्ये शरद पवार हे ८५ वर्षांचे होणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार यांना आपण आपल्या पक्षाचे ८५ आमदार निवडून द्यायचे आहेत. हे लक्षात ठेवा, असे विधान ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये, तर अजित पवार गटाने मुंबईत साजरा केला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी जोरदार भाषण केले. रोहित पवार म्हणाले की, दुसऱ्या राष्ट्रवादीकडे पैसा, सत्ता असला तरीही जनतेने त्यांना नाकारले आहे. पवार हे रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाच्या भावावर बोलत आहेत. आता हे यश पाहून आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. येणाऱ्या निवडणुकीत पलीकडच्या अनेक लोकांना आपण विश्रांती द्यायची आहे, असा टोला त्यांनी मारला.