जरांगे-पाटील यांचे उपोषण मागे.

24 प्राईम न्यूज 14 Jun 2024. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण गुरुवारी सहाव्या दिवशी मागे घेतले. मंत्री शंभुराजे देसाई, खासदार संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने दुपारी जरांगे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. महिनाभराच्या मुदतीत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेत ताकद दाखविण्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही जरांगे यांची भेट घेतल होती.
