घरातील द्वारिद्रय आणि बिकट परिस्थीला सामोरे जात त्याने आपला पोलीस होण्याच्या स्वप्नाला सत्त्यात उतरवलं

अमळनेर/प्रतिनिधी. पिंगळवाडे येथील तरुणाने अति प्रतिकुल परिस्थिततीत राहून घरातील आई वडील व एक मोठा भाऊ यांनी मनोजच्या शिक्षणासाठी. खूप मेहनत घेतली. आई आणि वडील यांनी गावातील सावकार,शेतकरी यांच्याकडे मोल मजुुरी करुन त्याच्या शिक्षणाचा खर्च चलवला आणि मोठ्या भावाने हि स्वत: कंपनीत कामाला जाऊन त्याच्या शिक्षणावर त्याचा सर्व पगार त्याने खर्च केला पण मनोजने हि आपल्या आई वडिलाच्या कष्टाची जाणीव व मोठ्या भावाच्या कष्टाची जाणीव लक्षात घेऊन व त्याच्या शब्दाचा मान राखुन त्याने स्वतः आपल्या मेहनत व परिस्थिती वर मात कुरून, आपल्या मुंबई पोलीस दलान सामील व्हायच्या स्वप्नाला सत्त्यात उतरवून दाखवल. एवढ्यच नव्हे तर तो सुध्दा आपल्या सुट्टीच्या दिवशी कामाला जायचा आणि त्या पैशांवर पुस्तक व बसच्या पास साठी खर्च देखील करायचा. त्यानंतर तो रेग्युलर आपल्या ग्राऊड व अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचा. घरातील द्वारिद्रय आणि बिकट परिस्थीला सामोरे जात त्याने या आपला पोलीस होण्याच्या स्वप्नाला सत्त्यात उतरवलं आणि आपल्या आई वडिलाचं आणि मोठ्या भावाचे स्वप्न हि त्याने साध्य केलं मनोजला मुंबई .शहर पोलिस वाहन चालक म्हणुन निवड करण्यात आली. तसेच मनोज पोलिस दलात निवड झाल्या बध्दल पिंगळवाडे गावात गावकऱ्यांनी डि जे लाऊन मिरवणूक काढली व शुभेच्छा देऊन कौतुक हि केला.