रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने कुपोषित बालकांचे शिबिराचे आयोजन.

0

अंमळनेर/प्रतिनिधि. रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे 27-6-2024 वार गुरुवार रोजी कुपोषित बालकांचे शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व रोटरी क्लब अमळनेर कडून प्रोटीन किटचे 30 डबे वाटप करण्यात आले, तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रांजली पाटील डॉ. पी.के तांबे यांच्या मार्गदर्शनाने बालरोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी रो.डॉ जी एम पाटील यांनी कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी केली त्यामध्ये काही बालकांची रक्तांची चाचणी, एक्स-रे संदर्भ सेवा व सुविधा देण्यात आल्या, सदर कार्यक्रमात रोटरीचे नुतन अध्यक्ष रो. ताहा बुकवाला, रो. डॉ दिलीप भावसार, रो. प्रदीप पारख, रो.प्रतीक जैन, रो.देवेंद्र कोठारी उपस्थित होते व त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ.सुमित पाटील, डॉ.गणेश पाटील, डॉ. परेश पवार,डॉ.तनुश्री दामले ,डॉ नरेंद्र पाटील ,डॉ प्रिया पटेल, सौ वैशाली पाटील ,श्री गिरीश शिंदे, आरोग्य सेविका पुनम नारे समुपदेशक अश्वमेध पाटील, अशोक सोनवणे, सीडीपीओ श्रीमती प्रेमलता पाटील यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!