मोबाईलवरील बोलणे महागणार ? -लवकरच २५ टक्के दरवाढ शक्य.

24 प्राईम न्यूज 28 जून 2024. मोबाईल आता प्रत्येकाचा जीव की प्राण झालेला आहे. सतत मोबाईलवर बोलणे, इंटरनेट सर्किंग, आवडत्या मालिका पाहणे, बँकिंग आदी सर्वच कामे हाताच्या बोटासरशी मोबाईलवर होत असतात. आता याच मोबाईलवरील बोलणे महागण्याच्या तयारीत आहे. कारण कंपन्यांनी दूरसंचार स्पेक्ट्रमसाठी हजारो कोटी मोजले आहे. आता ती गुंतवणूक परत मिळवण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून भाडेवाढ अटळ असल्याचे दिसते. येत्या दसऱ्या, दिवाळीपासून मोबाईलवर बोलणे महाग होण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञ ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केला.
वोडाफोन आयडियाने ३५१०.४ कोटी, जिओने ९७३.६२ कोटींचे स्पेक्ट्रम विकत घेतले. आता स्पेक्ट्रम खरेदी संपल्यानंतर सर्व मोबाईल कंपन्यांचे लक्ष आता मोबाईल दरवाढ करण्याकडे आहे. या कंपन्या लवकरच दरवाढ करतील, असे आयआयएफएल सिक्युरिटीज, जे. पी. मॉर्गन, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज यांच्या अहवालात नमूद केले आहे.