टी-20मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वविजेता ! -अंतिम सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय.

0

24 प्राईम न्यूज 30 Jun 2024. टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारत शनिवारी दुसऱ्यांदा विश्वविजेता बनला. याआधी भारताने २००७ मध्ये पाकिस्तानला नमवून पहिल्यांदा टी-२० विश्वचषक आपल्या नावावर करण्याची किमया साधली होती. त्यानंतर आता जवळपास १७ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकत विश्वविजेता बनण्याचा किताब आपल्या नावावर केला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाहोता. भारताने प्रथम फलंदाज करत दक्षिण आफ्रिकेला ६गड्यांच्या बदल्यात – १७७ धावांचे आव्हान दिले होते, मात्र दक्षिण आफ्रिका १६९ धावांतच गारद झाली. भारताचा ७ धावांनी विजय झाला. भारतीय संघाकडून तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपसिंगने प्रत्येकी २ गडी मिळवले, तर सलामीवीर फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी करत भारताच्या विजयात सिहांचा वाटा उचलला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!