सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने नियुक्ती द्यावी अशी मागणी. -अखिल भारतीय सफाई मजदुर कामगार संघटना.

0

अमळनेर /प्रतिनिधी. लाड पागे समितीने केलेल्या शिफारशी प्रमाणे व उच न्यायालयाच्या औरंगाबाद (संभाजी नगर) खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील सफाई कामगारांच्या वारसांना रिक्त पदांवर तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी अमळनेर येथील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सह इतर कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
नगरपरिषदेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील सेवानिवृत्त व मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या रिक्त जागी नेमणूक देण्यासंदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या लाड पागे समितीने शिफारशी केल्या होत्या. या शिफारशी प्रमाणे अनुसूचित जातीतील सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या रिक्त जागी नेमणूक दिली जात होती. मात्र, उच्च न्यायालयांच्या औरंगाबाद (संभाजीनगर) खंडपीठात श्री.कैलास राव कुंवर व इतर यांनी दाखल केलेल्या रिट याचीकेचा संदर्भ देऊन शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जाती घटकांना वारसा हक्क प्रमाणे नियुक्ती घेता येणार नाही असे परिपत्रक काढले होते. हा अन्याय असल्याची भावना सफाई कामगार व त्यांच्या वारसांमध्ये निर्माण झाली होती. या याचिकेत त्रयस्थ पक्ष म्हणून अमळनेर येथीलच रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी शासनादेशा विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या याचिकेचा नुकताच निकाल लागला असून अनुसूचित जातीच्या सर्व सेवानिवृत्त व मयत सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या रिक्त जागी नेमणूक देण्यात यावी असे आदेश झाले आहेत. या आदेशानुसार अमळनेर नगर परिषदेतील सेवानिवृत्त झालेल्या‌ सफाई कामगारांचे वारस असलेल्या श्रीमतीशीला जगदीश लोट व इतर ९ वारसांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांची भेट घेवून मयत व सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने नियुक्ती द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच ‌ लाड पागे समितीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना आचारसंहितेची कोणतीही अडचण येत नसल्याचे कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर‌ श्रीमती शीला जगदीश लोट ‌व‌ इतर ९ सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांना अमळनेर नगर परिषदेच्या सेवेत सामावून घेतले जाईल तसेच उच्च न्यायालयातील रीप्रियाची येणे दिलेल्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जातींना ‌ न्याय दिला जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत दिलीपण्णा चांगरे, रघुनाथ रामभाऊ मोरे, बिंदूकुमार सोनवणे, गिताबाई खरारे, नंदलाल तेजी, विकास टिल्लू जाधव, रुपचंद पारे,नवल बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे,‌विनोद जाधव,‌राम पवार‌‌ यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!