अल्पसंख्याकांच्या विविध योजनांची अंमलबजावणीची एजाज बागवान यांची मागणी.

0

नंदुरबार /प्रतिनिधि. महाराष्ट्र अल्पसंख्यांक विकास विभागात कार्यरत असलेले मंत्रालयात उपसचिव मा. मोईन ताशिलदार साहेबांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांनी मुंबई मंत्रालयात समक्ष भेट घेवून त्यांची महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या आयुक्तालय औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) हज हाऊसला सुरु करण्यात आले. म्हणुन त्यांची महाराष्ट्र अल्पसंख्यांक विकास विभागाचे पहिले आयुक्त म्हणून त्यांना अल्पसंख्यांकांच्या समस्या व निवेदन देवून चर्चा करण्यात आली.

त्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्यांकांचे सर्वांगीण विकास झालेला नाही. म्हणजे केंद्र व राज्यातील विविध योजना अंमलात आलेल्या नाहीत. जसे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जाचक अटी-शर्ती तत्काळ कमी करणे व शैक्षणिक आणि व्यवसायीक कर्ज तत्काळ बिना व्याजाने देण्यात यावे. शैक्षणिक शिष्यवृत्ती व पंधरा कलमी कार्यक्रम पहिले आयुक्त मा. मोईन ताशिलदार साहेब निश्चित गती आणतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्यांक विकास विभागाचे पहिले आयुकत मा. मोईन ताशिलदार साहेबांची नियुक्ती अतिशय शिस्तप्रिय व उत्तम प्रशासक व धडाडीचे कार्य करणारे आणि निर्णायक क्षमता असलेले त्यांच्या ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन व काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांनी गुलाब पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!