मोटरसायकल अडवत एकाला शिवीगाळ करत केली मारहाण…. -पोलीस अधीक्षकांनी भेट देत निरपराध लोक वेठीस धरले जाऊ नये याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या..

अमळनेर /प्रतिनिधी. रस्त्यात एकाची मोटरसायकल अडवून त्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच फायटर ने जखमी करून सोन्याची चैन आणि रोख रक्कम काढून घेतल्याची घटना १ रोजी रात्री अकरा वाजता घडली.मनोज ठाकरे हे १ रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास इनो ची पुडी घ्यायला झामी चौकात गेला असता रात्री ११ वाजता तो परत कसाली डीपी कडून येत असताना त्यांना वसीम खान, कमील उर्फ कालु रिक्षावाला, बाबा शहा, तन्वीर शहा, एजाज पठाण, असलम पठाण उर्फ अय्या तसेच अज्ञात १० ते १२ इसमानी अडवून त्याला शिवीगाळ करणे सुरू केले. नन्तर त्याला खाली पाडण्यात आले. तसेच एकाने फायटर नाकावर मारून दुखापत केली व इतरांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन व खिश्यातील ५ हजार ६०० रुपये काढून घेण्यात आले. मनोज ने मार वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. नन्तर पोलिसांनी मनोज ची मोटरसायकल आणली असता पेट्रोल ची टाकी, सीट फाडून नुकसान केले. मनोज च्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध रस्ता अद्विळून जबरी चोरी, दंगा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्ताफ, वसीम, बाबा शहा या तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी कुणाल सोनवणे, यांनी भेट दिली. दोन्ही समाजाची बैठक बोलवा आणि काही मोजक्या समाज कंटकांमुळे विनाकारण निरपराध लोक वेठीस धरले जाऊ नये याची काळजी घ्या अशा सूचना पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिल्या.