विशाळगडावर दहशत पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा. मुस्लिम सेवा संघतर्फे अपर तहसीलदार प्रशासनाला निवेदन.

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे हिंदुत्ववादी समाजकंटकांनी दहशत माजवित मशिद पाडली. तसेच पवित्र ग्रंथाची जाळपोळ केली. इतक्यावरच न थांबता ज्येष्ठ नागरिक, मुस्लीम महिलांसह मुलांना मारहाणही केली. या घटनेचा आज मुस्लिम सेवा संघतर्फे निषेध करण्यात आला. यासंबंधी अपर तहसीलदार प्रशासनाला निवेदन देवून समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मुस्लिम सेवा संघचे जिल्हाध्यक्ष मंजुम पठाण यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१४ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे असलेल्या रझा मशिदीची काही हिंदुत्ववादी समाजकंटकांनी तोडफोड केली. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने मात्र बघ्याची भुमिका घेत कार्यवाही केली नाही. परिणामी, स्थानिक मुस्लीम समाजातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या गावगुंडांना तसेच त्यांना चिथावणी देणाऱ्या राजकीय वरदहस्तावर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील निवेदन देण्यात आले मुस्लिम सेवा समिती धुळे जिल्हा अध्यक्ष मंजुल पठाण, शरीफ पिंजारी, हमाज पठाण, मुस्ताक शाह, नदीम शेख, रईस शेख, आदी उपस्थित होते.