विशालगढ येथील घटनेसंदर्भात कठोर कारवाई करा….                                                 -दोंडाईचा एआयएमआयएमतर्फे अपर तहसीलदार याना निवेदन…

0

प्रतिनिधि/रईस शेख

दोंडाईचा येथे विशाळगड प्रकरणी झालेल्या घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेल्या संभाजीराजे यांना तत्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी अपर तहसीलदार संभाजी पाटील यांना शिष्टमंडळाने दिले. यावेळी संभाजी राजे यांच्यावरील करावी अशीही मागणी करण्यात आली.

रविवार (दि. १४) काही समाजकंटकांनी पद्धतशीर नियोजनबद्धपणे विशाळगड अतिक्रमण विरोधातील आंदोलनाचे नियोजन केले होते. या आंदोलनाला काहींनी हिंसक वळण दिले. गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील घरांवर व प्रार्थनास्थळावर दगडफेक केली, तोडफोड केली. आई-बहीण व लहान मुलांना क्रूर पद्धतीने मारहाण केली. पुरोगामी कोल्हापूरला हे अशोभनीय आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी तसेच दंगलचे सूत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून प्लानिंग करून याकरिता रसद पुरविण्यात आली, असा आरोप यावेळी करण्यात आला. सदर दंगलीतील दोषीविरुद्ध यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी. सदरील निवेदन देण्यात एआयएमआयएम शिंदखेडा तालुका अध्यक्ष जुबेर शेख, दोंडाईचा शहर अध्यक्ष मोईनोदीन मंन्सुरी, शोएब बागवान,एजाज शेख, रईस शेख, तौसिप मन्यार, शाहरुख मंन्सुरी, अयाज सैय्यद, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!