लाडकी बहिण योजना मतदारसंघात राबविण्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करणार.        -सभापती अशोक आधार पाटील यांचे विरोधकांच्या विरोधाला आव्हान

0

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर मतदारसंघातील शेवटच्या लाभार्थी महीलेपर्यंत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पोहचवण्यासाठी महायुती कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून संबंधित शासकीय यंत्रणांना महाराष्ट्र शासनाचा मंत्री या नात्याने ना.अनिल भाईदास पाटील यांच्याकडून आदेश देण्यात आले असून विरोधकांकडून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले.
शहरातील विविध भागात नगरपालिका तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत फार्म भरून घेतले जात आहेत.यावेळी महिलांना येणाऱ्या अडचणी,कागदपत्रांची पूर्तता यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.सरकारच्या या योजनेचा फायदा सर्वसामान्य गरीब,वंचित,निराधार महिलांना होणार आहे.मात्र ही योजना कशी अपयशी ठरेल यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांकडून मतदारसंघात अपप्रचार केला जात असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून शासकीय यंत्रणा करत असलेल्या कामाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न होत असून यामुळे महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून या योजनेला विरोध करणाऱ्या विरोधकांना चोप देणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांनी सांगितले.
जास्तीत जास्त महिला या योजनेपासून वंचित रहाव्या यासाठी महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून खोटेनाटे प्रयत्न सुरू असले तरी ही योजना तळागाळापर्यंत राबविण्यासाठी महायुती चे कार्यकर्ते मेहनत घेणार असून विरोधकांचे षडयंत्र हाणून पाडू असे अशोक आधार पाटील यांनी सांगितले.

ना.अनिल पाटील यांच्याकडून आढावा शहरातील इंदिरा भवन येथे पालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या केंद्राला ना.अनिल भाईदास पाटील यांनी स्वतः भेट दिली.यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. मतदारसंघातील एकही महिला वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे त्यांनी महिलांना आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!