कृषिभूषण साहेबराव पाटील तुतारी फुकणार. – -राष्ट्रवादी शरद पवार निष्ठावंतांच्या मेळाव्या प्रसंगी साहेबराव पाटील यांची हजेरी.

अमळनेर/प्रतिनिधी. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शद पवार गटाच्या पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी
मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.निष्ठावंतांच्या मेळाव्या प्रसंगी साहेबराव पाटील यांनी अनपेक्षित हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.शरद पवार यांनी अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत अशी काळजी आम्ही घेवू असे सूचक विधान केले होते. निष्ठावंतांचा मेळावा या ठिकाणी साहेबराव पाटील यांनी हजेरी लावून शरद पवार यांच्या विधानाला दुजारा दिलेला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे जळगांव येथील मेळाव्यात जयंत पाटील यांनी देखील साहेबराव पाटील हे पूर्ण ताकदीने अमळनेरची विधानसभा लढतील असे सांगितल्याने कार्यकर्तयांनी बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांनी फटाक्याची आतषबाजी करत आनंद व्यक्त करत एकच वादा साहेबराव दादा अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला
मेळाव्यात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रशांत निकम, अनंत निकम व वसुंधरा लांडगे यांनी पक्ष प्रवेश केला. सभेला तिलोत्तमा पाटील, सचिन पाटील,श्याम पाटील आधी मान्यवर उपस्थित होते.