विशाळगडावर दहशत पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा. हिंदू ,मुस्लिम समाजातर्फे प्रशासनाला निवेदन.


अमळनेर/प्रतिनिधी. अमलनेर शहरातील सर्व हिंदु-मुस्लिम समाज तर्फे निवेदन देण्यात आले अल्पसंख्याक मुस्लीम समाजा मध्ये दहशत निर्माण करण्याचा उद्देशाने व राज्यात जातीय तेड निर्माण करून अशांतता पसरविण्या साठी आंतकवादी कृत्य करीत समाजकटकांनी पोलीसांचा उपस्थितीत नंगांनाच करीत निरपराध लोकांना लहान मुलाना व महिलांना अमानुसपने मारहाण केली. या घटनेचा आम्ही सर्व मुस्लिम समाज जाहिर निषेध करीत आहोत. भ्याड हल्ला करील असतांना चा विडीयो देखील व्हायरल झाल असून आज पावेतो कुठलीच ठोस कार्यवाही झाली नहीं असे असतांना संबंधीत आतंकवादयाना तवरीत व तात्काळ अटक करून त्यांचावर कठोर करण्यात यावी व झालेल्या नुकसानाची शासनाने भरपाई करावी, ज्या पोलीसांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा काम कैला आणि त्यांच्या समक्ष मशीद तौड़ली गेली त्या पौलीसांवर देखील निलंबनाची कार्यवांही त्वरीत करण्यात यावी, तसेच कोल्हापुर जिल्हा अधिकारी व पोलीस अधिक्षकांची हकालपटटी तात्काळ करावं राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या वेळी हाजी नसीर, सलिमटोपी,आरिफ भाया, दबिर पठण,गुलामनबी, शेख सईद,रियाज भाई,रोहिदास सुकलाल,प्रवीण रामदास, अखतर अली,शकील काझी, संदीप घोरपडे सर, आबिद अली,अल्तमश शेख,राजेंद्र साळुंके, डॉ अनिल शिंदे, तिलोत्तमा ताई, सह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होता.