मोदी, शहांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायची आहे – मनोज जरांगे.

महाराष्ट्रात मराठाआणि ओबीसी आरक्षण प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू
केले आहे. त्यांच्या उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस होता. भाजपच्या पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणी मेळाव्यात मराठा आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. यावर मनोज जरांगे म्हणाले की, अमित शहा हे मोठी माणसं आहेत. ते मोठे लोक आहेत. ते कशाला आमच्या गरीब मराठ्यांकडे लक्ष देणार. ते गरिबांना लाथा मारतात. त्यांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायची आहे. त्यांना मराठा समाजाचीमते पाहिजे होती. त्यांची सत्ता स्थापन झाली. आता ते गरीब मराठ्यांना लाथा मारतील. गरिबांचे मुडदे पाडणारे हे कपटी लोक असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची नियत आहे, पण भाजप सत्तेत आल्यानंतरच मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन का सुरू होते, असा सवाल अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी रविवारी पुण्यात केला होता. शरद पवार यांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर काय भूमिका आहे याचा खुलासा त्यांनी करावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर मनोज जरांगे- पाटील म्हणाले की, अमित शहा, नरेंद्र मोदी ही मोठी लोकं आहेत.