शांताराम बोरसे यांचे दुःखद निधन

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर – तालुक्यातील गडखांब येथील रहिवासी शांताराम पोपट बोरसे वय 79 यांचे दि.23 रोजी अल्पशा आजाराने जळगाव येथे दुःखद निधन झाले.
ते अमळनेर येथील भू विकास बँकेचे निवृत्त अधिकारी होते. गडखांब विकास सोसायटीचे चेअरमन पदही त्यांनी भूषविले होते. सेवानिवृत्तीनंतर ते प्रजापिता ब्रह्मकुमारीचे जळगाव येथील कार्यालयात सक्रिय सहभागी होते. गडखांब येथील सुभाष बोरसे व रंगराव बोरसे यांचे ते मोठे बंधू तर अमळनेर येथील शिव मोबाईलचे संचालक योगेश बोरसे यांचे काका होते.