शिंदखेडा तालुका जयभाऊंचाच बालेकिल्ला.. -शिंदखेडा तालुका ख. वि. संघाच्या चेअरमनपदी भाजपचे श्रावण माळी तर व्हा. चेअरमनपदी भालेराव बेहेरे यांची निवड.

दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख
शिंदखेडा : शिंदखेडा तालुका दोंडाईचा येथे खरेदी विक्री संघाच्या खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी श्रावण माळी (मालपुर) तर व्हा. चेअरमनपदी भालेराव बेहेरे (वारुड) यांची तसेच शिंदखेडा शाखेच्या चेअरमन पदी सुवर्णा सतिष बेहेरे (विरदेल) यांची तर नरडाणा शाखेच्या चेअरमनपदी महेंद्र खैरनार (होळ) बिनविरोध निवड संपन्न झाली. शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघात माजी मंत्री आमदार जयकुमारभाऊ रावल याच्या मार्गदर्शनाखाली १९ पैकी १९ जागा भाजपच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक भुपेंद्र निकम बाम्हणे, माधुरी सिसोदे, नरडाणा, प्रमोद पवार, वरपाडे, डि.एस.गिरासे, अलाणे, साहेबराव गोसावी मेथी, राजेंद्र बागुल मांडळ, उमेश गिरासे शिंदखेडा, गुणवंत सूर्यवंशी डांगुर्णे, सुनील पाटील बाभूळदे, भिमसिंग गिरासे टाकरखेडा, शंकर जाधव दाऊळ, गुलाब पाटील सुराय, राजेंद्र शंकर पाटील देगाव, शामसिंग गिरासे विकवेल, प्रवीण पाटील चिलाणे उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि.प. सभापती डि.आर.पाटील, पं.स.सभापती रणजित गिरासे, माजी जि.प.उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, भाजप तालुकाध्यक्ष दिपक बागल, बाजार समिती उपसभापती आर.जी.खैरनार, पाटील, माजी जि प सदस्य नथा पाटील, माजी सभापती तथा संचालक जिजाबराव सोनवणे, माजी सभापती डाॅ.दिपक बोरसे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सूरज देसले, माजी उपसभापती साहेबराव पेंढारकर, बाजार समिती संचालक पी.एल.पवार, हर्षवर्धन बागल, शामकांत पवार, दगेसिंग गिरासे, मोतीलाल कोळी, संजय ठाकरे, आत्माराम पाटील, माजी पंस सदस्य दगाजी देवरे, वारूळचे ग्रा प सदस्य बाळा पवार उपस्थित होते.