अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी गुणवंत पाल्यांचा होणार गौरव..

अमळनेर /प्रतिनिधी…… येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभाचे आयोजन २८ जुलै २०२४ रविवार रोजी सकाळी ८.३० वाजता स्टेट बँक मागे, इंदिरा भवन अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचेवतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इ १० वी व १२ वी यात ८०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे मार्कशीट ची झेरॉक्स कॉपी बँकेच्या वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांचेशी संपर्क साधून जमा करावेत.
शतक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे , व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले आहे.