पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू.

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
दोंडाईचा : दोंडाईचा शहरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एक मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोंडाईचा वस्ती परिसरातील ही दुर्दैवी घटना घडली. अल्ताफ शाह (उर्फ भुऱ्या) अवघ्या १८ वर्षांची ही एक अल्पवयीन मुलं मृतावस्थेत सापडली असून त्यांच्या कुटुंबियांना एकच टाहो फोडला.
दोंडाईचा जावीद नबी पिंजारी, सालीम पिंजारी, जुबेर शहा, आशिष शहा, वाजिद मिर्जा आदी युवकांनी वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. तीन वाजेचे सुमारास शोध घेण्यासाठी सुरुवात केली तब्बल तीन साडेतीन तास युवकांचा शोध सुरू होता अखेर ६:४५ वाजे दरम्यान अल्ताफ शहा (उर्फ भुऱ्या) मिळून आला याप्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. परंतु डॉ.पारुल अग्रवाल यांनी मृत्यू घोषित केला.
जुबेर शेख, बिलाल बागवान, मोहसीन शेख, अक्ररम तेली, रियाज मिर्झा,शाकीर लोहार , आदींनी घटनास्थळी सहकार्य केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नकुल कुमावत, पुरुषोत्तम पवार, हिरालाल सूर्यवंशी, चालक शिरसाठ घटनास्थळी सहकार्यासाठी धाव घेतली.