मनसे विधानसभेच्या २२५ जागा लढणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्वबळाची घोषणा.

0

24 प्राईम न्यूज 26 Jul 2024. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी वांद्रे येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ही घोषणा केली. तसेच विधानसभा निवडणुकीत २०० ते २२५ जागा लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्ट घडणार आहे. आम्ही सर्वच जण तयारीला लागलो आहोत. युती होणार की नाही हा विचार तुम्ही करू नका, परंतु आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत, असे ठाकरे म्हणाले.

राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत याकडे कोणाचे लक्ष नाही. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हाच तुमच्या प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले, तर आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, ने कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितले की आपल्याकडचे एक, दोन लोक दुसरीकडे जायला निघाले आहेत. मी म्हणालो की, जरूर जा. हवे तर जाण्यासाठी मीच रेड कार्पेट घालतो, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!