चलो वॉर्ड चलो पंचायतअंतर्गत युवक काँग्रेस अमळनेरच्या वतीने अमळनेर न पा मुख्यअधिकारी यांना निवेदन.


अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर येथील वॉर्ड क्र. 5 जापान जीन भागातील रस्त्यांची व गटारींची दयनीय अवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षा पासून येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे निवेदन मध्ये म्हटले आहे की जापान जीन भाग हा न पा हद्दीतील सर्वात जास्त कर भरनारा परिसर आहे तरी देखील येथील नागरीकांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाही मस्जिद कडे जाणाऱ्या रस्त्यावर लहान शाळेतील मुलं नमाज ला जाताना वयोवृद्ध व महिलांचे अतिशय हाल होत आहे वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देखील दिले आहे परंतु न पा प्रशासन नुसते आश्वासन देत आहे येत्या 15 दिवसाच्या आत रस्ते गटारीनचे काम केली नाही तर संविधानिक उपोषण करू असा इशारा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली व जापान जीन येथील रहिवाशी नागरिकांनी दिले आहे.
