शहरातील शाळा , कॉलेज , क्लासेसच्या बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदबोस्त करा. – -जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थीनीच्या वतीने निवेदन.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहर हे जळगाव जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नावाजलेले असून या ठिकाणी शेजारील शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठ्यासंख्येने येत असतात परंतु शाळा , कॉलेज , क्लासेस सुटल्यावर विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा घेत काही टवाळखोर , विकृत , टारगट , शाळाबाह्य तरुण विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या व टॉनटींग करत मुलींना त्रास होईल असे वर्तन करण्याच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संबंधी सामाजिक प्रतिष्ठा जोपासून वाद-विवाद होण्याच्या भीतीने तक्रार करायला कोणीही पुढे येत नाही. संस्था मालक व क्लासेसचे मालक सदर प्रकार बाहेर रोड वर होत असल्याने वरील प्रश्नांवर उपाय योजना करायला तयार नाहीत. तरी पोलीस विभागाचा माध्यमातून आपण अश्या टारगट , विकृत , टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पाऊले उचलून विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे हि विनंती. यावेळी श्याम पाटील ( शहराध्यक्ष ) , डॉ.बी. एस.पाटील ( प्रदेशउपाध्यक्ष ) , तिलोत्तमा पाटील ( प्रदेश सरचिटणीस ) , प्रा.अशोक पवार ( ज्येष्ठ कार्यकर्ते ) , अक्षय चव्हाण , आरती पाटील , धनश्री चव्हाण , वसुंधरा लांडगे , गिताली बेहरे , उर्वशी पाटील , आशुतोष पाटील , राहुल बिऱ्हाडे , बापूराव पाटील , दर्पण वाघ , शुभम पवार , देव गोसावी , यश हापसे , अजिंक्य चीखलोदकर , सोहम शिंदे , राहुल पाटील , उज्वल मोरे , निलेश पाटील , संदीप पाटील हे उपस्थित होते.